top of page

मासे जबाबदारीपूर्वक का खावेत?

आपल्या सर्वानांच मासे खायला खूप आवडतात आणि ते दीर्घकाळ खाण्याची सर्वांचीच इच्छा आहे. पण गेल्या २० वर्षात आपल्या आवडीचे मासे मिळणे अवघड झाले आहे कारण समुद्रात सुद्धा त्यांची संख्या कमी होत आहे. ह्याचे मुख्य कारण म्हणजे समुद्रातील मासे वर्षभरात त्यांच्या संख्येंमध्ये जितकी भर घालू शकतात त्याच्यापेक्षा जास्त मासे आपण प्रत्येक वर्षी पकडत आहोत. ह्यालाच अतिरिक्त मच्छिमारी असे म्हणतात.

आपल्याला आवडणारे मासे आपण हक्काने मागतो खरे पण हिच मागणी अतिरिक्त मच्छिमारीला काही प्रमाणात जबाबदार आहे.

 

श्रवण महिन्याचेच उदाहरण घ्या. ऑगस्ट - सप्टेंबर मध्ये आधी श्रावण महिना येतो आणि नंतर गणेश चतुर्थी. बहुतांश हिंदू ह्या महिन्यात मांसाहार करीत नाहीत. त्यामुळे ह्या महिन्यांमध्ये समुद्रामध्ये नियमितपणे जाऊन मासे पकडणे मच्छिमारांना परवडत नाही. ह्या कारणामुळे बहुतांश मच्छिमार ह्या महिन्यांमध्ये मच्छिमारीसाठी जात नाहीत त्यामुळे माशांच्या संख्येवर सुद्धा मच्छिमारीचा खूप दबाव पडत नाही

 

ह्याविरुद्ध नाताळ व नवीन वर्षाच्या वेळी खाण्याच्या माशांना खूप मागणी असते. अशा वेळी मच्छिमार मासे पकडण्यासाठी विशेष प्रयत्न करतात. आणि त्यामुळे मच्छिमारी सुद्धा बऱ्याच प्रमाणात वाढते.

KYF_WER_Graph.png
Overfishing_WebSize.jpg

ह्या गणेश चतुर्थीच्या आणि नाताळच्या उदाहरणावरून आपल्याला हे कळते कि ग्राहकांकडून येणाऱ्या मागणीमध्ये मच्छिमारीवर निदान काही प्रमाणात तरी प्रभाव पडण्याची क्षमता असते. आणि ह्याच कारणामुळे आपण सुद्धा अतिरिक्त मच्छिमारीला आळा घालण्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलू शकतो. कुठल्या महिन्यात कुठला मासा खावा आणि कुठला खाऊ नये ह्याची खबरदारी जर आपण घेतली तर आपण आपल्या आवडीच्या माशांवर त्यांच्या विणीच्या हंगामात पडणाऱ्या मच्छीमारीच्या दबावाला कमी करायचा प्रयत्न करू शकतो. म्हणून आपण जबाबदारी पूर्वक मासे खावेत.

bottom of page